सोनी एन्टरटेन्मेंट KBC च्या 12व्या सीझनची घोषणा केली;

पहिल्यांदाच एक संपूर्ण डिजिटल निवड आणि स्क्रीनिंग प्रक्रिया लागू केली 9 मे पासून नोंदणी सुरू होऊन 22 मे रोजी रात्री 9.00 पर्यंत चालू राहणार सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने कौन बनेगा करोडपती (KBC) च्या 12 व्या सीझनची घोषणा केली. 20 वर्षांपूर्वी सुरू झालेला KBC हा बहुधा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध शो आहे. ज्ञानाच्या सामर्थ्याने सामान्य माणसाचे जीवन पालटून टाकणारा शो म्हणून KBC चा लौकिक आहे. या शो ची निर्मिती करणार आहे, स्टुडिओनेक्स्ट आणि त्यासाठी आवश्यक ती निवड प्रक्रिया डिजिटल माध्यमातून सोनीलिव द्वारे योजण्यात येईल.


सध्याच्या संकटसमयी यंदाची संपूर्ण निवड प्रक्रिया डिजिटल असणार आहे. स्मार्टफोन्सचा सर्वदूर झालेला प्रसार आणि सर्वसामान्य जागरूकता यामुळे सर्व कान्या-कोपर्यांपर्यंत KBC चा प्रचार होऊन पूर्वीपेक्षाही अनेक पटींनी जास्त मोठा प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.


टप्पा 1 – नोंदणी


सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन KBC च्या 12व्या सीझनची नावनोंदणी 9 मे पासून सुरू करून 22 मेपर्यंत चालू ठेवेल. श्री. बच्चन दररोज रात्री 9.00 वाजता सोनी टीव्हीवर एक नवीन प्रश्न विचारतील. तुम्ही या प्रश्नांची उत्तरे SMS किंवा सोनीलिवच्या माध्यमातून देऊ शकाल.


टप्पा 2 – स्क्रीनिंग


नोंदणी प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्या लोकांमधून, काही पूर्व-निर्धारित नोंदणी निकषांच्या आधारे यादृच्छिक (रॅन्डम) रित्या काही प्रतिस्पर्धी निवडण्यात येतील, ज्यांचा पुढील मूल्यमापनासाठी टेलीफोनवरून संपर्क साधण्यात येईल.


टप्पा 3 – ऑनलाइन ऑडिशन


KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच, सामान्य ज्ञान चाचणी आणि व्हिडिओ सबमिशनसह सोनीलिवच्या माध्यमातून ऑडिशन्स घेण्यात येतील. हे एक खूप कठीण काम वाटत असले, तरी एका साध्या ट्यूटोरियलच्या माध्यमातून त्याचे सर्व तपशील समजावून सांगण्यात येतील. हे ट्यूटोरियल सोनीलिववर सहज उपलब्ध असेल.


टप्पा 4 – व्यक्तीगत मुलाखत


ऑडिशनमधून निवडलेल्या लोकांची शेवटच्या फेरीत व्यक्तीगत मुलाखत घेण्यात येईल, जी व्हिडिओ कॉलमार्फत योजण्यात येईल. एका स्वतंत्र ऑडिट कंपनीद्वारे या संपूर्ण निवड प्रक्रियेची तपासणी करण्यात येईल. पहिल्यांदाच श्री. बच्चन यांनी KBC साठी आपल्या घरात राहूनच चित्रीकरण केले आहे. सुप्रसिद्ध चित्रपटकार नितेश तिवारी यांनी दुरूनच नोंदणीच्या प्रोमोचे दिग्दर्शन केले आहे. लक्षवेधक अशा या प्रोमोद्वारे श्री. बच्चन KBC मध्ये सहभागी होऊ इच्छिणार्या लोकांना आवाहन करत आहेत व पुन्हा एकदा सांगत आहेत की, हर चीज को ब्रेक लग सकता है... सपनों को नहीं..


नोंदणी सुरू होत आहे, 9 मे रोजी रात्री 9:00 वाजल्यापासून फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर