यूएसए आणि भारतात होणार एकाच वेळी प्रसारण
पुणे, 7 मे: बहुतांश व्यावसायिक आणि कॉर्पोरेट जग सध्यस्थिती मध्ये कोविड १९ या जागतिक संकटामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा आणि संकटाचा सामना करत आहेत. हे संकट आणि त्यावरील समाधान यासाठी आज ४ प्रमुख आणि जागतिक लिडर्स एकत्र आले आहेत. बॅसेट एज्यूकेशन इंडिया द्वारा आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत. ११ मे रोजी हा कार्यक्रम ऑनलाईन ब्रॉडकास्ट होईल.
यावेळी हे जागतिक व्यावसायीक आपले विचार प्रस्तुत करतील आणि या समस्येतुन बाहेर पडण्याच्या मार्गावर देखील चर्चा करतील. झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक एस युआन. पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक,अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे. टाटा टेक्नॉलॉजीजचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वॉरेन हॅरिस. बॅसेट अँड बॅसेट अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी,कम्युनिकेशन मॅनेजर आणि समुपदेशक लेलँड बॅसेट हे यावेळी उपस्थित राहतिल. बॅसेट एज्युकेशन इंडियाच्या सीईओ विद्या मूर्थी यांच्या नियंत्रणाखाली हे पॅनेल संभाषण होईल.
“डिकोडिंग डिसरप्शन” हा ऑनलाइन कार्यक्रम सोमवार ११ मे रोजी सायंकाळी ८ वाजता विनामूल्य वेबिनार थेट प्रक्षेपण होईल. आयएसटी ७.३० वाजता, पीडीटी १०.३० वाजता, आणि ईडीटी अमेरिका आणि भारतात एकाच वेळी प्रसारित होईल. या दुर्मिळ संधी बद्दल बोलताना बॅसेट एज्युकेशन इंडियाच्या सीईओ विद्या मूर्थी म्हणाल्या, “या चार जागतिक व्यवसायिकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाच्या कथा उल्लेखनीय आहेत. त्यांचे नेतृत्व आणि अनुभवामुळे अनेक दशकांपासुन चालणार्या संघटनांना मदत झाली आहे. आज जगभरातील अनिश्चितता वाढत असताना, आम्हाला आनंद झाला आहे की एकत्रितपणे सामना करणे, टिकून राहणे आणि प्रगतीच्या धोरणाची एकत्रितपणे चर्चा करण्यासाठी हे अनुभवी मान्यवर उपलब्ध आहेत. ”
या पॅनेलचे सदस्य समस्यांचा सामना करणे, शक्यता वाढविणे यासारख्या मानवी पैलूंवर नवीन कल्पना मांडतील. तसेच मते व्यक्त करताल आणि सल्ला देतील. ज्येष्ठ अधिकारी आणि कॉर्पोरेट व्यवस्थापक आर्थिक आव्हाने आणि मानवी जीवन यावर देखील ते प्रकाश टाकतील. कॉर्पोरेट जगाच्या सदस्यांव्यतिरिक्त, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, विशेषसंघटनांचे सदस्य, नोकरशाह आणि पत्रकारांना या सत्रातील महत्त्वाच्या उपक्रमांचा मोठा फायदा होईल. तथापि, कोविड-१९ मध्ये पूर्वीपेक्षा जास्त मनुष्यबळ-केंद्रित असणे आवश्यक आहे. झूम सेमिनार साठी पूर्व नोंदणी अनिवार्य आहे.
ZOOM – FREE WEBINAR REGISTRATION LINK
http://bit.ly/35AloTQ